Latest

‘ओरायन’चे ‘चंद्रचुंबन’! जपानचे एक यान बेपत्ता

मोहन कारंडे

कॅप कॅनव्हेरल; वृत्तसंस्था : 'आर्टेमिस-1' या चांद्रमोहिमेत अमेरिकेने सोडलेल्या 'ओरायन' या यानाने चंद्राभोवती घिरट्या घालायला प्रारंभ केला असून, सोमवारी हे यान चंद्राच्या अगदी जवळून म्हणजे 90 कि.मी. अंतरावरून गेले तसेच नील आर्मस्ट्राँगने जेथे चांद्रभूमीवर पाऊल ठेवले त्या जागेवरून ते पुढे गेले. जणू या यानाने 'चंद्रचुंबन'च घेतले.

दुसरीकडे, जपानच्या चांद्रमोहिमेला मात्र धक्का बसला आहे. त्यांच्या दोनपैकी एका यानाचा संपर्क तुटला असून, चंद्रावर उतरण्याची मोहीम बारगळल्यात जमा आहे. अमेरिकेची मानवयुक्त चांद्रमोहीम तीन वर्षांनंतर आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी 'आर्टेमिस-1' मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेल्या 'ओरायन' या यानाने चंद्राभोवती पहिली फेरी पूर्ण केली आहे. हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर लक्ष केंद्रित करीत छायाचित्रे टिपणार आहे.

SCROLL FOR NEXT