Latest

Winter Session Press Conference : अधिवेशनात विरोधकांनी प्रश्न विचारण्यासाठी सज्ज रहावं; उपमुख्यमंत्री फडणवीस

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज (दि. ६) पत्रकार परिषद पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना धारेवर धरले. अधिवेशनात विरोधी पक्षांनी प्रश्न विचारण्यासाठी सज्ज रहावं आम्ही त्यांना हवी ती उत्तरं आणि वेळ देण्यासाठी तयार आहोत अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी यावेळी दिली. (Winter Session Press Conference)

मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागांचा विकास व्हावा यासाठी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेतलं जातं. पण तरीही विरोधकांनी नाराजी दर्शविली आहे. वडेट्टीवार यांनी NCRB चा अहवाल कसा वाचायचा हे शिकून घ्यावं असा टोलाही फडणवीसांनी लगावला. कंत्राटी भरतीचा जीआरबाबत विरोधकांनी मुद्दा उचलला आहे. पण हा जीआर दीड महिन्यापूर्वीच रद्द करण्यात आला आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावं.

बॅनरबाजीवरुन विरोधकांवर टीका

आम्ही आज काही बॅनर बघितले. त्यावर लिहिले आहे की, १० दिवसच अधिवेशन. पण ज्यांनी नागपूरमध्ये अधिवेशन घेतलच नाही ते आता अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याचा आरोप करत आहेत.

सत्तारुढ पक्ष सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सज्ज आहे. येत्या काळात ज्या सुधारणा आणि उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्यावर आमचे लक्ष आहे. विरोधी पक्षांनी आवश्यक ते प्रश्न उचलावेत, हवा तो वेळ आम्ही त्यांना देऊ अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT