Latest

LIC : एलआयसीची बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी

Sonali Jadhav

मुंबई : भारतीय जीवन विमा प्राधिकरण म्हणजे एलआयसीने ( LIC )17 ऑगस्ट ते 21 ऑक्टोबर 2022 या काळात बंद पडलेल्या पॉलिसीज पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष रिव्हायव्हल कॅम्पेन आणली आहे.

सर्व नॉन युलिप पॉलिसीज याअंतर्गत पॉलिसीधारकांना पुन्हा सुरू करता येतील. यात ग्राहकांना विलंब शुल्कात आकर्षक सवलतही देऊ केली आहे. शेवटचा प्रीमियम भरलेली तारीख पाच वर्षांच्या आतील असेल तर अशा सर्व पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी पॉलिसीधारकांना एलआयसीने यानिमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. मायक्रो इन्शुरन्स पॉलिसीजना जोखमीपासून संरक्षण मिळावे यासाठी विलंब शुल्कात पूर्ण माफी मिळेल. वैद्यकीय सुविधांमध्ये मात्र कोणतीही सवलत दिली जाणार नाही. काही विशिष्ट परिस्थितीमुळे ज्या पॉलिसीधारकांना प्रीमियम भरता आला नाही आणि त्यांची पॉलिसी बंद पडली अशांसाठी ही मोहीम सुरू केली असून पॉलिसीधारकांसाठीही दुर्मिळ संधी आहे. याद्वारे पॉलिसी पुन्हा सुरू करून पॉलिसीचे लाभ त्यांना मिळू शकतील.

  • एकूण भरावयाची रक्‍कम विलंब शुल्कात सवलत (टक्केवारीत) कमाल सवलत
  • एक लाखापर्यंत 25 टक्के रुपये 2500
  • एक लाख ते तीन लाख 25 टक्के रुपये 3000
  • तीन लाख ते त्यावरील रक्कम 30 टक्के रुपये 3500
SCROLL FOR NEXT