Latest

शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, या मागणीसाठी विरोधकांनी आज आंदोलन केले. विधानभवनाबाहेर पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, तात्काळ मदत जाहीर करा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भूजबळ, सतेज पाटील, अमोल मिटकरी यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT