Latest

Christopher Nolan : अहो आश्चर्यम! ‘ओपेनहायमर’चे दिग्दर्शक स्मार्टफोन वापरत नाहीत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्कृष्ट चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचे नेहमीच कौतुक केले जाते. अनेक चित्रपटांपैकी चर्चेत असलेला बायोग्राफीकल थ्रिलर "ओपेनहायमर" एक आहे. (Christopher Nolan) ब्रिटिश-अमेरिकन चित्रपट निर्माता ख्रिस्तोफर नोलनकडे अद्वितीय अशी स्वतःची शैली आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, तंत्रज्ञानाच्या युगात, नोलन स्मार्टफोन ठेवत नाही. (Christopher Nolan)

नोलन यांनी स्वत: या खुलासा केला आहे की, ते स्मार्टफोन ठेवत नाहीत. किंवा ईमेलचा उपयोग करत नाहीत. आपली स्क्रिप्ट अशा कॉम्प्युटरवर लिहितात, ज्यामध्ये कुठलेही इंटरनेट नाही. ते म्हणाले की, ते खूप सहजपणे विचलित होताता आणि स्वत:ला तंत्रज्ञानापासून दूर ठेवतात. असे केल्याने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येते. पूर्ण दिवस माझ्यासाठी स्मार्टफोन खूप उपयोगी पडत नाही. ते म्हणतात की, "कदाचित माझी मुले मला म्हणतील की, मी पूर्ण लुडाइट आहे." "लुडाइट" शब्दप्रयोग अशा व्यक्तीसाठी केला जातो, जे नवे तंत्रज्ञान आणि काम करण्याच्या पद्धतींचा उपयोग करण्याचा विरोध करतात.

खास म्हणजे, नोलन यांनी खुलासा केला की, त्यांनी सीजीआयविना ओपेनहायमर अणुस्फोट निर्माण केला होता. रिपोर्टनुसार, नोलनने हे दृश्य तयार करण्यासाठी कॉम्प्युटरची मदत घेतली होती. कारण ॲनिमेशन करण्यात आणि पाहण्यात सोपं जातं. त्यांनी सेटवरट दृश्ये चित्रित केली.

नोलन यांचा "ओपेनहायमर" चित्रपट एक हाय-प्रोफाईल स्टार कास्ट आहे, ज्यामध्ये रॉबर्ट डाउनी ज्युनियर, मॅट डेमन आणि सिलियन मर्फी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट पुलित्जर पुरस्कार विजेते जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्यावर आधारित आहे. ओपेनहायमर एक अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ होते.

SCROLL FOR NEXT