Latest

कोल्हापूर : म्हाकवेत दुचाकी-कारच्या धडकेत एक ठार: दोघे गंभीर जखमी

अविनाश सुतार

म्हाकवे; पुढारी वृत्तसेवा : म्हाकवे ते गोरंबे रस्त्यावर मोटरसायकल व कारची समोरासमोर जोराची धडक होऊन अपघात झाला. यात आनंदा महादेव पाटील (वय 50 रा. म्हाकवे ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची नोंद कागल पोलिसांत झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेले माहिती अशी, बाळासो बाबुराव पाटील, दयानंद सिद्राम पाटील, आनंदा महादेव पाटील हे  मोटरसायकल (एम एच 09 FP 8827) वरून गोरंबेकडे जात होते. यावेळी कार (एम एच झिरो नाईन Ek 7002) गोरंबेकडून म्हाकवेकडे येत होते. रोप्याच्या ओढ्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.  बाळासो पाटील, दयानंद पाटील यांच्या पायाला मार लागला. तर आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. नितीश रामचंद्र डावरे यांच्या मालकीची कार आहे.
दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरात होती की, कार 50 फूट पुढे सरकत गेली . तर मोटरसायकलचा चक्काचूर झाला.

SCROLL FOR NEXT