Latest

पिंपरी : चिखलीत दीड लाखाचे दागिने चोरीला

अमृता चौगुले

पिंपरी : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी देवघरातील दीड लाखाचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 10) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पाटीलनगर, चिखली येथे घडली. याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा रविवारी रात्री उघडा होता. दरम्यान, उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी देवघरातून दोन सोन्याचे नेकलेस असा एक लाख 47 हजार रुपये कितमीचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT