Latest

धुळ्यात लाचखोर कॉन्स्टेबल सह एका पंटरला अटक

गणेश सोनवणे

धुळे पुढारी वृत्तसेवा- पान दुकानावर गुटख्याची विक्री करणे तसेच जनावरांची वाहतूक करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. यातील 17000 रुपये स्वीकारताना धुळ्याच्या आझाद नगर पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल सह एका पेंटरला बेड्या ठोकण्यात आले आहे. या संदर्भात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तकारदार यांचा आझादनगर पोलीस स्टेशन हददीत मौलवीगंज चौकात पानचे दुकान आहे. आझादनगर पोलीस स्टेशनचे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख यांनी पंटर अब्दुल बासित अन्सारी यांना तक्रारदार यांच्या पानदुकानावर पाठवुन तक्रारदार यांना पानाचे दुकान चालवायचे असेल व त्यांचेवर गुटखा विकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच तक्रारदार यांचेकडील खाजगी वाहनातुन जनावरांची वाहतुक करीत असल्याचे समजले असुन त्यावर कारवाई न करण्यासाठी ३०,०००/- रुपये दयावे लागतील असे तक्रारदार यांना सांगितले होते.

त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख व पंटर अब्दुल बासित अन्सारी यांनी तक्रारदार यांना पारोळा रोड येथे बोलावुन तक्रारदार यांच्याकडुन १७,०००/- रुपये घेतले होते. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख यांनी तकारदार यांच्या मोबाईलवर फोन करुन उर्वरित १३,०००/- रुपये पंटर बासित अन्सारी यांच्याजवळ देण्यास सांगितले. या संदर्भात तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्याकडे कार्यालयात समक्ष येवुन तकार दिली होती.

सदर तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती १२,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम पंटर अब्दुल बासित अन्सारी यांच्याकडेस देण्यास सांगीतले. आज पंटर अब्दल बासित अन्सारी याने मौलवीगंज चौकात तक्रारदार यांच्या पानदुकानासमोर तक्रारदार यांच्याकडुन सदर लाचेची रक्कम स्विकारल्याने पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख व पंटर अब्दुल बासित अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आले. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT