Latest

ओमायक्रॉनचा धारावीत शिरकाव; प्रशासनातर्फे माहिती घेण्याचे काम सुरू

backup backup

पुढारी ऑनलाईन

मुंबईमध्ये काेराेनाचा नवा व्‍हिरियंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून, धारावीत पहिला बाधित रूग्ण आढळला आहे. बाधित व्यक्ती टांझानियातून परतली आहे. त्या रूग्णाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची प्रशासनातर्फे माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

देशात हळूहळू कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. सध्या देशभरात एकूण ओमायक्रॉनचे सहा रूग्ण झाले असून, दिल्ली, गुजरात मध्ये प्रत्येकी एक तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रत्येकी दोन अशी संख्या झाली आहे.

काल महाराष्ट्रात सापडलेला डोंबिवलीमध्ये राहणारा 33 वर्षीय पहिला रूग्ण, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत दाखल झाला होता. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या बारा अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. दिल्ली ते मुंबई विमान प्रवासात या तरुणाच्या 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT