Latest

क्रांतिदिनी मराठा समाज आरक्षणाचा पुन्हा एल्गार

अमृता चौगुले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील सगळ्याच राज्यकर्त्यांनी व राजकीय पक्षांनी मराठा समाजाला हेतुपुरस्सर आणि योजनाबद्ध पद्धतीने आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. यामुळे मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी क्रांतिदिनी पुन्हा एकदा आरक्षणाचा एल्गार होणार आहे. बुधवारी (9 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य लढ्यात 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधी यांनी मुंबईमध्ये बि-टिशांविरोधात 'भारत छोडो'चा नारा दिला होता. म्हणजेच स्वातंत्र्य क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रात झाली. तो लढा बि-टिशांविरोधात होता. याची पुनरावृत्ती यंदा 9 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत आहे. संवेदना हरविलेले शासन, राज्यकर्ते आणि राजकीय पक्षांच्या विरोधात मराठा आरक्षणासाठी पुन्हा क्रांतीची हाक देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी करू किंवा मरू या ध्येयाने आंदोलनाचा वणवा पेटविण्यात येणार आहे. यात कर्तव्य भावनेने आणि प्रचंड संख्येने मराठा माता, बंधू, भगिनी, मुले-नातवंडे, यांच्यासह सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT