Latest

पुणे : चिमुकल्या डोळ्यांनी अनुभवलं विमानतळावरचं व्यवस्थापन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनाथाश्रमातील चिमुकल्या मुलांना कोणीही फिरायला घेऊन जाणारे नसते. कोणी खाऊ देणारे नसते. परंतु, पुणे विमानतळ प्रशासनाने पुढाकार घेऊन गुरूवारी शहरातील एका अनाथाश्रमातील मुलांना खाऊ देत, संपुर्ण विमानतळाची एक सफर घडवली. पुणे विमानतळ प्रशासनाच्या वतीने स्नेह छाया अनाथाश्रमातील मुलांना एक सामजिक भान जपत या विमानतळ भेटीचे नियोजन करण्यात आले होते.

इतर वेळी विमानतळावर सुरक्षेच्या कारणावरून प्रवासी वगळता कोणालाही फिरकता येत नाही. मात्र, अनाथाश्रमातील मुलांना विमानतळाकडून खास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाकडून यावेळी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी विमानतळाचे संचालक संतोष ढोके, व्यवस्थापक संजय दुलारे, सहाय्यक जनरल मॅनेजर (एचआर) मंदा लांडगे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT