Latest

दिवाळी पाडव्याला कोल्हापुरात असतो म्हशींचा रोड शो

स्वालिया न. शिकलगार
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्क : हलगीचा कडकडाट… घुंगराचा चाळ… नटवलेल्या म्हशींचा बाज व म्हैस मालकांचा उत्साह अशा वातावरणात दिवाळी पाडव्या दिवशी कोल्हापुरात रोड शो आयोजित केले जातात. ही जुनी पंरपरा गेली अनेक वर्षं कोल्हापूरने जपली आहे.
शनिवार पेठेतील गवळी गल्ली, पंचगंगा नदी घाट, सागरमाळ, कसबा बावडा, पाचगाव या ठिकाणी पाडवा तसेच भाऊबीजेच्या दिवशी हे 'रोड शो'  आयोजित केले जातात. हे पाहण्यासाठी शहरवासीयांची गर्दी उसळते.
दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशी सजविण्याचा पारंपरिक बाज कोल्हापुरात आजही जपला जातो. सकाळी पंचगंगा नदीवर म्हशी आंघोळ घातली जाते. त्यानंतर सुशोभित केलेल्या म्हशी सागरमाळ येथे नेल्या जातात. सागरमाळ येथे सागरदेवाचे मंदिर आहे. म्हशींच्या अंगावर नक्षीकाम आणि विविध सामाजिक संदेश लिहिलेले असतात. गळ्यात व पायात घुंगराची माळ, शिंगांवर मोरपीसे, रिबीन याद्वारे म्हशींना सजविण्यात आले. सागर माळ येथे मोटरसायकलर म्हैस पळवणे, ३ हाकेत म्हैस पळवणे अशा विविध स्पर्धा भरवल्या जातात. गवळी गल्ली येथे मालकाला ओळखण्याची म्हशीची स्पर्धाही घेण्यात येतात.
पी-डबाक आणि हलगीच्या तालावर रंगणारा हा म्हशींचा 'रोड शो' पाहाण्यासाठी कोल्हापुरकर मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT