Latest

”गृहमंत्रालयात अधिकारी आहे” असं सांगत पुण्यातील महिलेला घातला 80 हजाराला गंडा

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गृहमंत्रालयातील महसूल खात्यात फाईल एडिटींग विभागात अधिकारी असल्याचे सांगून पंतप्रधान योजनेतून मुलींच्या शालेय शिक्षणाचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून करून देतो, अशी बतावणी करत दोघांनी एका महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी जान्हवी परब, रोशन परब (रा. दोघे आस्टिर अपार्टमेंट, श्रीपस्थ रोड, नालासोपारा ,मुंबई) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर 2022 ते 15 मार्च 2023 या कालावधीत ही घटना घडली आहे. याबाबत घोरपडी येथील 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

आरोपीनी फिर्यादींना ते गृहमंत्रालयातील महसूल खात्यातील विभागात अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या मुलींचा शालेय शिक्षणाचा खर्च केंद्र सरकारकडून पंतप्रधान योजनेतून करून देते, असे सांगितले. त्यासाठी दोन मुलींसाठी चाळीस हजार रुपये आरोपींनी फिर्यादींकडून घेतले. त्यानंतरदेखील विविध कारणे सांगून आणखी पैसे घेतले. अशा प्रकारे आरोपींनी फिर्यादींची 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोळेकर करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT