Latest

गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार

दिनेश चोरगे

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज दुपारी दीडच्या सुमारास पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत दिभना गावांनजीकच्या जंगलात घडली. ताराबाई लोनबले (वय ७०)  असे या मृत महिलेचे नाव आहे.

ताराबाई लोनबले ही जंगलात सरपण गोळा करीत असताना झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला व तिला काही अंतरावर फरफटत नेले. त्यात तिचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरात टी-६ वाघिणीचा वावर असून, तिने दहा दिवसांपूर्वी चार बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे तिनेच वृद्धेवर हल्ला केला असावा, असा अंदाज आहे. या वाघिणीसंदर्भात वनविभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

                हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT