Latest

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या चरणी महिन्यात १० किलो सोने अर्पण

Arun Patil

अयोध्या : उत्तर प्रदेशची धार्मिक राजधानी म्हणून ओळखले जात असलेल्या अयोध्या नगरीतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास शुक्रवारी एक महिना पूर्ण होत आहे. या कालावधीत देशातील 60 लाखांहून अधिक भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. प्रत्येक भाविक आपापल्या कुवतीनुसार रामलल्लासाठी देणगी आणि आभूषणे अर्पण करीत आहेत.

लाडक्या रामलल्लासाठी…

लाडक्या रामलल्लासाठी रोख रकमेच्या स्वरूपात 25 कोटींहून अधिक रक्कम प्रभू रामाच्या चरणी अर्पण केली आहे. सोने-चांदीच्या आभूषणापासून बनविलेल्या विविध वस्तूंची भेटही देण्यात आली आहे. 25 किलो चांदी आणि 10 किलो सोने राम मंदिर व्यवस्थापन समितीच्या दानपेटीत जमा झाले आहे.

23 जानेवारीपासून सार्वजनिक

22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दुसर्‍या दिवसापासून प्रभू रामलल्लाचे दरवाजे देशवासीयांसाठी खुले करण्यात आले.

विविध आभूषणे

रामलल्लासाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून बनविलेली आभूषणे अर्पण केली जात आहेत. सोन्या-चांदीच्या भांड्यासह हार, मुकुट, चुडी, खेळणी, पायल, धनुष्यबाण, अगरबत्ती स्टँड, दीप आदी विविध आभूषणांचा यामध्ये समावेश आहे.

दर्शनाची वेळ

भाविकांची गर्दी रोज वाढत असल्याने दर्शनाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT