Latest

Haldi Laagan Laagi : ‘ओ अंटवा’ मराठी व्हर्जन गाणाऱ्या रागिनीचं नवं गाणं

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय विवाह म्हटलं तर त्यात मेहंदी, संगीत, हळद असे नानाविध समारंभ येतातच, आणि या सर्व समारंभात रंग भरण्याचे काम त्या भागातील प्रादेशिक गाणी करतात. शिवाय, डेस्टीनेशन वेडींग म्हंटलं तर राजस्थान आलंच, आणि त्या ओघाने राजस्थानी संगीतसुध्दा! राजस्थानी संगीताचा हा दर्जा मराठमोळी गायिका रागिणी कवठेकरने (Haldi Laagan Laagi) ओळखत एक सुंदर गीत सादर केलं आहे. 'हलदी लागन लागे…' असं त्या गाण्याचं नाव असून आहे. हे गाणे अक्षय्य तृतीयेला सादर करण्यात आलं होतं. (Haldi Laagan Laagi)

या राजस्थानी हळदी गाण्याचे म्युझिक प्रोडक्शन, मिक्सिंग आणि मास्टरिंग डॉनी हजारिका यांनी केले आहे. डॉनी ॲण्ड रागिणी बँडने या गाण्याची रचना केलेली आहे.

सुरेश जाजू हे या गाण्याचे सहनिर्माते आहेत. हे गाणे जोधपूर येथे रेकॉर्ड करण्यात आले आहे. तसेच ते गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरमध्ये शूट करण्यात आले आहे. रागिणी कवठेकर हिने आपल्या सुरेल आवाजासोबतच राजस्थानी नृत्य सादर केले आहे. तिच्यासोबत राजस्थानी कलाकार कुमार गौतमही दिसतो. या गाण्याचे बोल आणि कोरिओग्राफी ज्योती झा यांनी केलं आहे.

रागिणीने यापूर्वी अनेक प्रादेशिक गाण्यांचे सादरीकरण केलं आहे. मुळची ठाणेकर असलेली रागिणी मराठी प्रेक्षकांसाठी लवकरच एक मराठी गाणे घेऊन येणार आहे. नुकतच तिचं साऊथमध्ये प्रसिद्ध असलेलं 'ओ अंटवा' गाण्याचं मराठी फिमेल व्हर्जन भरपूर गाजलं आहे.

SCROLL FOR NEXT