Latest

NZ vs SA : द. आफ्रिकेचे न्यूझीलंडला ३५८ धावांचे आव्हान

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : द.आफ्रिकाविरूद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉक आणि व्हॅन दर दुसेन यांची शतकी खेळी आणि अंतिम षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत डेव्हिड मिलरने केलेल्या अर्धशतकी खेळी केली. याच्या जोरावर द. आफ्रिकेने सामन्यात 4 बाद 357 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून  टीम साऊथीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.

द. आफ्रिकेची फलंदाजी

सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना आफ्रिकेचा कर्णधार बवुमा 24 धावाकरून बाद झाला. यानंतर सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि हेनरिक क्लासेन यांनी शतकी खेळी खेळली. ड्युसेनने 118 चेंडूत 133 धावा केल्या. डी कॉकने 116 चेंडूत 114 धावांची खेळी खेळली. डुसेनने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले. तर डी कॉकने १० चौकार आणि तीन षटकार ठोकले. डेव्हिड मिलरने 30 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि चार षटकार मारले. डी कॉक आणि व्हॅन दर दुसेनने दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागिदापी केली. हेन्रिक क्लासेन सात चेंडूत १५ धावा करून नाबाद राहिला आणि एडन मार्कराम एका चेंडूवर सहा धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने दोन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि जेम्स नीशम यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

दक्षिण आफ्रिका संघ : : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

न्यूझीलंड संघ : : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर,कर्णधार),ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT