Latest

NSEच्या सीईओंचा आला डीपफेक व्हिडिओ, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधान!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) आशिषकुमार चौहान यांचा चेहरा आणि आवाज वापरून ते काही शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत असल्याचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात 'एनएसई'च्या लोगोचाही वापर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एनएसईने काही स्टॉक्सची शिफारस करणाऱ्या फेक व्हिडिओंपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे.

त्यासाठी एनएसईची सर्व अधिकृत सोशल मीडिया हँडल एकदा तपासून घ्यावीत. तसेच सर्व गुंतवणूकदारांनी याची नोंद घ्यावी आणि एनएसई अथवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडून आलेल्या माहितीची त्यांच्या वेबसाइटवरून पडताळणी करावी. यासाठी अधिकृत माहितीसाठी गुंतवणूकदारांनी www.nseindia.com यावर भेट द्यावी, असे एनएसईने म्हटले आहे.

"आशिषकुमार चौहान यांचा चेहरा आणि आवाजाचा वापर चुकीच्या पद्धतीने गुंतवणुकीचा सल्ला देण्याऱ्या व्हिडिओमध्ये करण्यात आला असल्याचे आढळून आले आहे. असे व्हिडिओ आशिषकुमार चौहान यांच्या आवाजाचे आणि चेहऱ्यावरील हावभावांचे अनुकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले दिसतात," असे NSE ने एका निवेदनात म्हटले आहे.

यामुळे अशा फेक ऑडिओ आणि व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका आणि असे फेक व्हिडिओ किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमांमधून येणाऱ्या कोणत्याही गुंतवणूक किंवा इतर सल्ल्याचे पालन करू नका. हे लक्षात घेतले जाऊ शकते की एनएसईचे कर्मचारी त्या स्टॉकमधील कोणत्याही स्टॉकची किंवा डीलची शिफारस करण्यास अधिकृत नाहीत. याव्यतिरिक्त, जेथे शक्य असेल तिथे असलेले असे फेक व्हिडिओ या प्लॅटफॉर्मना काढून टाकण्यासाठी एनएसई विनंती करण्याचा प्रयत्न करत आहे.

NSE च्या प्रक्रियेनुसार, कोणतीही अधिकृत माहिती केवळ त्याच्या अधिकृत www.nseindia.com या वेबसाइटद्वारे दिली जाते. एक्सचेंज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांच्या अधिकृत X, फेसबुक, Instagram, LinkedIn आणि YouTube यावर माहिती देते. याची सर्व गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी आणि NSE किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडून आलेल्या कोणत्याही माहितीची त्यांच्या वेबसाइटवरून पडताळणी करावी, असे NSE ने म्हटले आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT