Latest

फक्त साडे नऊ हजार रुपयांच्या आत रेडमीकडून दमदार स्मार्टफोन लॉन्च; सोबत हटके फिचर्स आणि मेमरी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Redmi ने आपला Redmi 10A हा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 9.5 हजार रुपयांपेक्षा कमी असून, मार्केटमध्ये हा फोन येताच, याच्या मजबूत फीचर्समुळे या स्मार्टफोनचे अनेक चाहते बनतील, असे कंपनीचे मत आहे.

रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर हीलियो G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या 3 GB RAM + 32 GB इंटरनल व्हेरीयंटची किंमत 8,499 रुपये आहे. तर 4 GB RAM + 64 GB इंटरनल स्टोरेज व्हेरीयंटसाठी, तुम्हाला 9,499 रुपये खर्च करावे लागणार आहेत. Redmi 10A ची विक्री 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन mi.com, Mi Home आणि Amazon India या वेबसाईटवर किंवा या व्यतिरिक्त ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून देखील खरेदी करता येणार आहे.

Redmi 10A ची ही आहेत वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनमध्ये कंपनी 6.53-इंचाचा IPS डिस्प्ले, सनलाईट मोडसह देण्यात आला आहे. यामधील डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 30 तासांपर्यंत चालू शकते ही सुविधा देण्यात आलेली आहे. फोनसोबत तुम्हाला 10 W चा चार्जर देखील मिळेल. फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह, 13-मेगापिक्सलचा AI कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा नाईट आणि पोर्ट्रेट मोडमध्ये काम करतो. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस दिलेल्या कॅमेरा युनिटमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये कंपनीने RAM Booster फीचर देखील दिले आहे. त्याच्या मदतीने, RAM 5 GB पर्यंत वाढवता येते. प्रोसेसर म्हणून यामध्ये MediaTek Helio G25 चिपसेट देण्यात आली आहे. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 11 आधारित MIUI 12.5 आउट-ऑफ-द-बॉक्स वर कार्य करतो.

चला पाहुया कशी आहे मायानगरी मुंबई ? | Mumbai Darshan |

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT