Latest

विराट, एक दिवस आपण एकत्र खेळू : जोकोविचने शुभेच्छांबद्दल मानले आभार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाचा स्‍टार क्रिकेटपटू विराट कोहलीने जगातील अव्‍वल टेनिसपटू नोव्‍हाक जोकोविच याला ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँडस्लॅम स्‍पर्धेसाठी शुभेच्‍छा दिल्‍या होत्‍या. त्याच्या शुभेच्छांबद्दल जोकोविचने आभार मानले असून, तसेच त्‍याच्‍यासाठी एक खास संदेशही दिला आहे. ( Novak Djokovic thanks Virat Kohli for Australian Open wishes )
त्या दिवसाची मी वाट पाहत आहे…

२४-वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने आपल्‍या पोस्‍टमधून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे त्याच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत. तसेच भविष्‍यात आपण दोघे एकत्र खेळू, त्या दिवसाची मी वाट पाहत आहे, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला आहे.
( Novak Djokovic thanks Virat Kohli for Australian Open wishes )

काय म्‍हणाला होता विराट?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, विराटने आपले जोकोविचबरोबर मैत्री कशी झाली याची आठवण शेअर केली. तो म्‍हणाला की, "मी एकदा जोकोविच याचा इंस्टाग्रामवर प्रोफाईल पाहत होतो. मी मेसेज बटण दाबले आणि मी फक्त हॅलो म्हणावे असे वाटले; मग मी माझ्या डायरेक्‍ट मेसेज वर (DM) त्याचा मेसेज पाहिला. मला असे वाटले की, हे बनावट खाते आहे; पण नंतर मी पुन्हा तपासले तेव्‍हा ते नोव्‍हाकचे अधिकृत खाते असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. आम्ही बोललो. आम्ही वेळोवेळी संदेशांची देवाणघेवाण करत असतो. त्याच्या सर्व आश्चर्यकारक कामगिरीबद्दल मी त्याचे अभिनंदन केले होते, असेही विराटने सांगितले होते.
२०२४ ऑस्‍ट्रेलियन ओपनसाठी जोकोविचला शुभेच्छा. या स्पर्धेत जगाला त्याच्यातील सर्वोत्तम खेळ पाहायला मिळेल, असा विश्‍वासही विराट कोहीलने यावेळी व्‍यक्‍त केला होता.

जोकोविच ऑस्‍ट्रेलियन ओपच्‍या दुसऱ्या फेरीत

जोकोविचने पहिल्या फेरीत क्रोएशियाच्या डिनो प्रिझ्मिकविरुद्ध विजय मिळवला. दुसरा सेट गमावल्यानंतर पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जोकोविचने १८ वर्षीय प्रिझमिकचा ६-२, ६-७ (५), ६-३, ६-४ असा पराभव केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT