Latest

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ठणठणीत!

Arun Patil

मुंबई, पुढारी डेस्क : इंडोनशियात नाट्यमय अटक आणि त्यानंतर भारतात प्रत्यार्पण करण्यात आलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा अटकेनंतरचा पहिला फोटो तब्बल 9 वर्षांनी समोर आला आहे. या फोटोत राजन निरोगी आणि ठणठणीत दिसत आहे.

राजन सध्या तिहार तुरुंग क्र. 2 मधील उच्च सुरक्षा कक्षात बंद आहे. त्याचे छायाचित्र समोर आल्याने कोव्हिड काळात त्याचा मृत्यू झाल्याची बातमी अफवा होती, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, या फोटोमुळे राजनवर तुरुंगात हल्ला होण्याच्या भीतीने गुप्तचर यंत्रणा गांगरून गेल्या आहेत.

राजनला दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्याकडून सातत्याने धमक्या येत आहेत. अनेकदा त्याला तुरुंगात मारण्याची धमकी मिळाली होती. ऑक्टोबर 2015 मध्ये भारतात प्रत्यार्पण झाल्यापासून तो तिहार तुरुंगात आहे. तथापि, तिहार प्रशासनाने आजवर कधीही त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली नाही.

मे 2020 मध्ये, याच तुरुंगात बलात्काराच्या आरोपीला विषाणूची लागण झाली होती आणि बिहारचा माफिया डॉन-राजकारणी शहाबुद्दीनचाही मृत्यू झाला होता. त्याची माहिती तुरुंग प्रशासनानने दिली. मात्र, राजनच्या प्रकृतीबाबत तुरुंग अधिकारी कधीच बोलले नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT