Latest

Nothing phone : ‘NOTHING’च्या Phone (2a) 5G स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'NOTHING' या कंपनीने मार्केटमध्ये जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यासोबत कंपनीने युजर्ससाठी खास डिस्काऊंट ऑफरदेखील लॉन्च केली आहे. ही ऑफर आज (दि.१२) दुपारपासून सुरू होत आहे. 'NOTHING' कंपनीचा Phone (2a) 5G, २३ हजार ९९९ चा स्मार्टफोन केवळ आजच ऑफरमध्ये १९ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असून, युजर्सना या ऑनलाईन ठिकाणावरून फोन खरेदी करता येणार आहे. तसेच इतर सवलती आणि सूटही कंपनीने या खरेदी ऑफरमध्ये दिली आहेत. (Nothing phone)

लंडनमधील ब्रिटीश ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी 'NOTHING' ने  Phone (2a) 5G हा स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. नव्याने मार्केटमध्ये आलेल्या या स्मार्टफोनवर आज दुपारपासून डिस्काऊंट ऑफर देण्यात येत आहे. हा स्मार्टफोन केवळ व्हाईट आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. 8 GB RAM, 128 GB ROM तसेच, . 128 GB RAM, 256 GB ROM ने सुसज्ज असलेले स्मार्टफोन विक्रीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोन खरेदीदरम्यान खास EMI सुविधा देखली उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ७ दिवसांचे बदली धोरण देखील या खास ऑफरमध्ये देण्यात आले आहे. यामुळे सात दिवसांत तुम्ही स्मार्टफोन बदलू शकता, असेदेखील कंपनीने स्पष्ट केले आहे. (Nothing phone)

'NOTHING' च्या Phone (2a) 5G ची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये

  • मीडियाटेक डायमेंसिटी 7200 प्रो
  • 17.02 सेमी (6.7 इंच) पूर्ण HD+ डिस्प्ले
  • 8 GB रॅम | 128 जीबी रॉम
  • 50 + 50 MP रिएर कॅमेरा
  • 32 MP फ्रंट कॅमेरा
  • 5000 mAh बॅटरी

उपलब्ध ऑफर्स

  • Axis Bank क्रेडिट कार्ड Txns वर बँक ऑफर 10% सूट
  • Axis Bank क्रेडिट कार्ड EMI Txns वर बँक ऑफर 10% सूट
  • Flipkart UPIT&C वापरून पहिल्या फ्लिपकार्ट ऑर्डरसाठी बँक ऑफर ₹25* झटपट सूट मिळवा
  • Flipkart Axis Bank CardT&C वर बँक ऑफर 5% कॅशबॅक
  • Axis Bank क्रेडिट कार्ड EMI व्यवहारT&C वर बँक ऑफर 1000 रुपयांची ची सूट
  • ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ईएमआय नसलेल्या व्यवहारांवर बँक ऑफर १२५० रुपयांची सूट
  • HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर बँक ऑफर 2000 रुपये सूट
  • Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड व्यवहारांवर बँक ऑफर 800 रुपये सूट

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT