Latest

तरंगणारा फेस नव्हे; ही आहे ‘स्वीट डिश’!

Arun Patil

माद्रिद : तुम्ही आतापर्यंत सर्वात विचित्र किंवा कल्पनाही करता येणार नाही, असा एखादा पदार्थ कधी खाल्लाय का? असा प्रश्न केल्यास तुम्ही किमान एखाद्या पदार्थाचे तरी नाव घ्याल. मात्र, एखादा फेसच वाटावा असा गोड पदार्थ तुम्ही कधी खाल्ला नसेल! असा पदार्थ स्पेनमध्ये मिळतो. ही 'स्वीट डिश' अनेकांना थक्क करते.

खाण्याच्या आवडी-निवडी काळानुरूप बदलल्या. पदार्थ बनवण्याची प्रक्रियाही पूर्णपणे बदलली. याला जोड मिळाली ती म्हणजे विज्ञानाची. कशी? सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही फोटो आणि व्हिडीओ हे जास्तच स्पष्टपणे सांगताना दिसत आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं, तर हा एक पदार्थ. हा आहे 'फ्लोटिंग फोम डेझर्ट'. नावावरून यात फेस आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. हा एक गोडाचा पदार्थ आहे हेसुद्धा

तुमच्या लक्षात येईल. पण आता या फेसाचे काम काय? विचारात पडलात ना? स्पेनमधील एका प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ मिळतो. सोप्या भाषेत सांगावं तर या गोडाच्या पदार्थावर तरंगणारा फेस त्याच पदार्थाचा एक भाग आहे. हेलियम आणि मातीच्या 'डिस्टिलेशन' प्रक्रियेतून तयार झालेल्या पाण्याचा हा फेस आहे. पदार्थावर जणू काही एक सुगंधी पाऊस पडतोय हे भासवण्यासाठी हा फेसरूपी ढग शेफ मोठ्या मेहनतीने तयार करतात.

SCROLL FOR NEXT