Latest

नोरा फातेहीमुळे भारताच्या शिरपेचात खोवला जाणार मानाचा तुरा, वाचा सविस्तर

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडला आपल्या ठुमक्यांवर थिराकायला लावणारी नोरा फातेही ग्लोबल स्टारही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? नोरामुळे भारताच्या शिरपेचात खोवला जाणार आहे मानाचा तुरा. याला कारण आहे येऊ घातलेलं फिफा वर्ल्डकप. या वर्षाच्या शेवटी जगावर फुटबॉल फिव्हर चढणार आहे. कतारमध्ये यंदाचा फिफा वर्ल्डकप आयोजित केला जाणार आहे. या सामन्यांच्या सोहळ्यात अभिनेत्री नोरा फतेही परफॉर्मन्स करणार असल्याचं समोर आलं आहे. या कार्यक्रमात परफॉर्मन्स करणारी नोरा पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे.

तर या सोहळ्यात परफॉर्म करणारी साऊथ ईस्ट एशियाचं प्रतिनिधित्व करणारीही ती पहिलीच कलाकार बनली आहे. नोरा नक्की कोणत्या गाण्यावर परफॉर्म करणार हे अजून गुलदस्त्यात आहे. Redone या जगप्रसिद्ध रेकॉर्ड कंपनीकडून नोराचं हे गाणं प्रदर्शित केलं जाणार आहे. Redone ने यापूर्वी शकिराचं 'wakaa wakaa' हे गाणं प्रदर्शित केलं होतं. या परफॉर्मन्समुळे नोरा शकिरा, जेनीफर लोपेझ, पिटबुल यांच्या यादीत जाऊन बसेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT