Latest

Nobel Prize in Economics : बेन बर्नान्के, डग्लस डायमंड, फिलिप डायबविग यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्‍कार जाहीर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Nobel Prize in Economics : या वर्षीच्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी तीन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. "बँका आणि आर्थिक संकटावरील संशोधन" साठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्टॉकहोममधील रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल समितीने सोमवारी (दि. 10) बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप एच. डायबविग यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला.

नोबेल समितीच्या मते, बर्नान्के, डायमंड आणि डायबविग यांनी सैद्धांतिक मॉडेल विकसित केले जे बँका का अस्तित्वात आहेत आणि समाजातील त्यांची भूमिका स्पष्ट करतात. बँका बंद झाल्याच्या अफवांचा समाजात काय परिणाम होऊ शकतो आणि त्याची शक्यता कशी कमी करता येईल. बँक बुडण्याची अफवा पसरताच लोक बँकांमधून ठेवी काढण्यासाठी धाव घेतात, असे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत बँक बुडण्याच्या धोक्यावर सरकारच्या वतीने ठेव विमा हाच उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा ठेवीदारांना कळते की सरकारने त्यांच्या पैशाची हमी दिली आहे, तेव्हा बँक बुडल्याची अफवा असूनही ते बँकांकडे धाव घेत नाहीत.

अर्थशास्त्रातील 'नोबेल' विशेष का आहे?

इतर नोबेल पारितोषिकांप्रमाणे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा उल्लेख अल्फ्रेड नोबेल यांच्या 1895 च्या मृत्युपत्रात करण्यात आला नव्हता. परंतु स्वीडिश सेंट्रल बँकेने त्यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराची नव्याने निर्मिती करण्यात आली. या क्षेत्रातील पहिले नोबेल 1969 देण्यात आले. या पुरस्काराचे अधिकृत नाव 'स्वेरिगेस रिक्सबँक प्राईज इन इकॉमॉमिक सायन्स इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल' (Sveriges Riksbank Prize in Economic Science in Memory of Alfred Nobel) असे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT