Latest

अन्न, औषध प्रशासनास मिळेना स्वतंत्र प्रयोगशाळा; चाचणी अहवालास महिनाभराचा कालावधी

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

अन्न व औषध प्रशासनाला स्वतंत्र प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याने प्रशासनाने पाठविलेल्या नमुन्यांचा चाचणी अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. नियमानुसार 14 दिवसांमध्ये अहवाल मिळणे आवश्यक असताना, त्यासाठी महिनाभराचा कालावधी लागत असल्याची बाब समोर आली आहे.

पुणे शहरातील राज्य आरोग्य प्रयोग शाळा व केंद्रिय खाद्यान्न प्रयोग शाळेमध्ये अन्न व द्रव्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. ही प्रयोग शाळा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अन्न व पाण्याची चाचणी केली जाते. सोबतच अन्न व औषध प्रशासनाने पाठविलेल्या नमुन्यांची देखील चाचणी केली जाते. या सर्वांचा अधिक ताण पडत असल्याने चाचणी अहवालास विलंब होत असल्याचे प्रयोगशाळा अधिकारी सांगत आहेत.

अन्न व औषध प्रशासनाला अद्यापपर्यंत स्वतंत्र प्रयोगशाळा नाही. मात्र, सहा महिन्यानंतर मोशी-चिखली येथे प्रयोगशाळा सुरू होणार आहे. पद निर्मितीसाठी मंजुरी मिळाल्यानंतर प्रयोगशाळा सुरू केली जाईल.
– संजय नारागुडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, औंध.

SCROLL FOR NEXT