Latest

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्‍यायालयाने फेटाळला

नंदू लटके

सिंधुदुर्ग : पुढारी ऑनलाईन

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज  सिंधुदुर्ग न्‍यायालयाने फेटाळला आहे.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आ. नितेश राणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात स्वतः हजर झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर साेमवारी सुनावणी झाली हाेती. आज न्‍यायालयाने त्‍यांचा जामीन अर्ज फेटाळला.

यापूर्वी सत्र न्‍यायालयाने त्‍यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला हाेता. मुंबई उच्च न्यायालयानेही अर्ज फेटाळताच त्यांनी सर्वोच्‍च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळत त्यांना दहा दिवसांत जिल्हा न्यायालयात हजर व्हावे, असे आदेश दिले होते. तोपर्यंत त्यांना अटक करू नये, असा दिलासाही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT