Latest

केरळमध्‍ये ‘निपाह’ अलर्ट, दोघा रुग्‍णांचा संशयास्‍पद मृत्‍यू

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केरळ राज्‍यातील कोझिकोड जिल्‍ह्यांत तापामुळे दोघा रुग्‍णांची संशयास्‍पद मृत्‍यू झाल्‍याची नोंद झाली आहे. तापामुळे मृत्‍यू झालेल्‍या दोन्‍ही रुग्‍णांना निपाह विषाणूचा (Nipah alert) संसर्ग झालेला असू शकतो, असा संशय आरोग्‍य अधिकार्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे. यामुळे राज्‍याच्‍या आरोग्‍य विभागाने निपाह अलर्ट जारी केला आहे.

कोझिकोड येथील एका खासगी रुग्‍णालयात तापामुळे दोन रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. तर अशीच लक्षणे असणारे तीन मुलांसह चौघांवर उपचार सुरु आहेत. मृतांपैकी एक २२ वर्षाचा तरुणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. सर्व रुग्‍णांचे नमुने पुणे येथील राष्‍ट्रीय विषाणू विज्ञान संस्था(एनआयव्ही) येथे पाठविण्यात आले आहेत. आज ( दि.१२) सायंकाळपर्यंत रुग्‍णाचे रिपोर्ट मिळणार आहेत यानंतर निपाह विषाणूचा संसर्गा झाला होता का याची पुष्टी होणार आहे, असे केरळ आरोग्‍य विभागाच्‍या सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, राज्‍यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली.

कोझिकोडमध्ये यापूर्वी दोनवेळा म्‍हणजे २०१८ आणि २०२१ या वर्षांपमध्‍ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे.

निपाह विषाणू प्राण्‍यांसह लाेकांमध्‍येही पसरु शकताे

जागतिक आरोग्‍यसंघटनेच्‍या (WHO) मते, निपाह विषाणू हा एक झुनोटिक विषाणू आहे, म्हणजे तो प्राणी आणि लोकांमध्ये पसरू शकतो. हा हवेतून पसरणारा संसर्ग नाही. मात्र दूषित अन्नाद्वारे किंवा थेट व्यक्ती-व्यक्तीद्वारे संक्रमित होऊ शकतो. निपाह विषाणू डुकरांना आणि माणसांमध्ये आजार निर्माण करण्यासाठी देखील ओळखला जातो. या विषाणूचे नाव निपाह हे मलेशियातील गावातून घेतले गेले आहे. येथे या विषाणूमुळे पहिला रुग्‍ण बळी गेला होता.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT