Latest

NIA Charge sheet : कोलकाता मध्ये दोन दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल; एनआयएची कारवाई

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) मंगळवारी (दि. ४) कोलकाता येथे प्रतिबंधित संघटना इसिसच्या (ISIS) दोन कथित कट्टर सदस्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. देशातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्रिय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सद्दाम उर्फ अब्दुल मल्लिक आणि अब्दुल रकीब कुरेशी यांच्याविरुद्ध एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने 6 जानेवारी रोजी शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके गोळा करून भारत सरकारविरुद्ध कट रचल्याचा आणि ISIS साठी भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काही तरुणांची भरती केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज केलेली ही कारवाई या प्रकरणातील महत्त्वाचा भाग आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT