Latest

New Zealand vs Australia : न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला फोडला घाम!

Arun Patil

वेलिंगटन : कॅमेरून ग्रीनच्या (103*) नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची (New Zealand vs Australia) गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत कशीबशी लाज वाचली. अखेर कांगारूंनी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 9 गडी गमावून 279 धावा केल्या. ग्रीन शिवाय एकही कांगारू फलंदाज किवी गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. ग्रीननंतर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा मिशेल मार्श होता, ज्याने 40 धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा मॅट हेन्रीने सर्वाधिक 4 विकेटस् घेतल्या.

न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने एका क्षणी 89 धावांत चार विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर स्टिव्ह स्मिथने 31 धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला आणि 89 धावांत ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर ग्रीन आणि मिशेल मार्श (40) यांनी डावाची धुरा सांभाळली आणि 77 चेंडूंत 67 धावांची भागीदारी झाली. मॅट हेन्रीने मार्शला बाद करून ही भागिदारी तोडली.

न्यूझीलंडचा भेदक मारा (New Zealand vs Australia)

हेन्रीने किवी संघासाठी 20 षटके टाकली आणि 7 निर्धाव षटकांसह 43 धावांत 4 बळी घेतले. त्याने स्टिव्ह स्मिथ (31), उस्मान ख्वाजा (33), मार्श (40) आणि नॅथन लियॉन (5) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याच्याशिवाय विल्यम ओरुर्के आणि स्कॉट कुग्गेलिजन यांनी 2-2 फलंदाजांना बाद केले. रचिन रवींद्रने 1 बळी घेतला. किवी संघाचा कर्णधार साऊदीला एकही बळी मिळाला नाही.

ग्रीनचे दुसरे शतक

कांगारू संघासाठी ग्रीनने एकाकी झुंज देत 155 चेंडूंचा सामना करत 103 धावा केल्या. तो अजूनही नाबाद असून, दुसर्‍या दिवशी त्याच्याकडून आणखी धावा होण्याची अपेक्षा आहे. त्याने आपल्या खेळीत 16 चौकार मारले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले. तर न्यूझीलंडविरुद्ध त्याचे हे पहिले शतक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 अर्धशतके आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT