Latest

Kane Williamson : केन विल्यमसन वनडे वर्ल्डकपमधून होणार ‘आऊट’!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसू शकतो. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यांचा भरावशाचा फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson) वनडे वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सकडून खेळणारा 32 वर्षीय केन विल्यमसन (Kane Williamson) सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापत इतकी गंभीर होती की त्याला सपोर्ट स्टाफच्या मदतीने मैदानाबाहेर जावे लागले. त्याचवेळी, या दुखापतीनंतर, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे की, त्याचे क्रूसिएट लिगामेंट तुटले आहे आणि त्यातून बरे होण्यासाठी त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे.

दुखापतीनंतर विल्यमसन (Kane Williamson) न्यूझीलंडला परतला आहे असून त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे स्कॅनद्वारे स्पष्ट झाले आहे. पुढील तीन आठवड्यांत केन यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शस्त्रक्रियेनंतर इतक्या कमी वेळेत बरे होणे फार कठीण आहे. त्यामुळे तो 2023 च्या विश्वचषकाच्या निवडलेल्या संघाचा भाग नसल्याची माहिती समोर आली आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे.

विल्यमसन काय म्हणाला?

विल्यमसन म्हणाला की, 'मला याआधीही खूप पाठिंबा मिळाला आणि त्यासाठी मी गुजरात टायटन्सचे आभार मानतो. अशी दुखापत झाल्यानंतर मी निराश होणे स्वाभाविक आहे, पण माझे लक्ष आता शस्त्रक्रिया करून पुन्हा फिटनेस मिळवण्यावर आहे. काही वेळ लागेल, पण लवकरात लवकर मैदानात उतरण्यासाठी मी माझ्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न करेन.'

विश्वचषकापर्यंत पूर्णपणे फिट होणे अशक्य

या प्रकारच्या दुखापतीतून सावरण्यासाठी आणि पूर्ण फिटनेस मिळवण्यासाठी बराच वेळ लागतो आणि हे पाहता विल्यमसन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होणे अशक्य दिसते. विल्यमसन म्हणाला, 'मी पुढील काही महिन्यांत मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड आणि संघाला कसा पाठिंबा देऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करत आहे.'

विश्वचषकापूर्वी विल्यमसनला तंदुरुस्त होणे कठीण असल्याचे न्यूझीलंडचे प्रशिक्षक स्टीड यांनाही वाटते. ते म्हणाले, 'आम्ही आशा सोडलेली नाही, पण सध्याची परिस्थिती पाहता ते अशक्य वाटते. आमच्या भावना सध्या केनसोबत आहेत. त्यांच्यासाठी हा कठीण काळ आहे. तुम्हाला ज्या प्रकारची दुखापत अपेक्षित होती ती अशी नाही. हा खरोखरच धक्का आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT