Latest

New Tyre : टुथब्रश प्रमाणे बदलू शकता गाडीचे टायर, पहा हे कसं काय शक्य!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाडीच्या सुरक्षेकरिता टायर व्यवस्थित असणे हे अत्यंत गरजेचे असते. यासाठी ते वेळच्यावेळी बदलणे हे महत्त्वाचे असते. पण ते कधी बदलावे हे समजणे सोपे काम नाहीये. टायर खराब असताना जर आपण गाडी चालवली तर ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. आता याच समस्येवर एका टायर कंपनीने उपाय काढला आहे. आता टुथब्रश बदलल्याप्रमाणे टायर बदलू शकतो.

कसे असेल टुथब्रश प्रमाणे बदलले जाणारे टायर

मार्केटमध्ये कित्येक असे टुथब्रश आहेत जे वेगवेगळ्या आणि आकर्षक रंगांमध्ये दिसून येतात. आता ज्यावेळी या ब्रशचा रंग फिका होत जातो त्यावेळी आपण तो बदलतो. आता याच ट्रिकचा वापर करत गाडीचे टायर हे थोडेसे अनोख्या शैलीत बनवण्याचा प्रयत्न CEAT या कंपनीने केला आहे. योग्य वेळी टायर बदलणे सोपे होण्याकरिता कंपनीने हे सोल्युशन काढले आहे.

कंपनीने नुकतेच एका नव्या टायरचे अनावरण केले आहे. या टायरवर वेगवेगळ्या रंगांची पट्टी असणार आहे. याचं वेगळेपण असे की ज्यावेळी तुम्ही नवे टायर घ्याल त्यावेळेस तुम्हाला या टायरवरील रंगांची पट्टी स्पष्टपणे दिसणार नाही. पण जसजसा या गाडीच्या टायरचा वापर होत जाईल तसे त्यावरील रंगाची पट्टी ही पूर्णपणे दिसू लागेल. यावर ग्राहक त्या टायरची झीज झाली असे अंदाज लावू शकेल.

टोयोटा कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय इनोव्हा आणि क्रिस्टा कारकरिता दोन नवीन टायरचे अनावरण करण्यात आले आहे. कंपनीने या गाड्यांकरिता आणलेल्या 15 इंच आणि 16 इंच अशा दोन टायरच्या साईज आहेत. जी त्यांच्या या कारच्या ग्राहकांकरिता ही खुशखबर आहे. कंपनीकडून असे सांगण्यात येत आहे की आगामी काळात इतर गाड्यांकरितादेखील असे टायर बनविण्याचे नियोजित आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT