बीजिंग : चिनी वैज्ञानिकांनी दावा केला आहे की त्यांनी एका शक्तिशाली नव्या सिंथेटिक अँटिबॉडीचा शोध लावला आहे. 'कोव्हिड-19' ला कारणीभूत ठरणार्या 'सार्स-कोव्ह-2' या कोरोना विषाणूचा ती चांगला मुकाबला करू शकते.
शांघायमधील फूडन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की त्यांनी ज्या सिंथेटिक अँटिबॉडीचा शोध लावला आहे ती कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटलाही हरवण्यास सक्षम आहे.
संशोधकांनी एका अन्य आजाराबाबतच्या संशोधनावेळी या अँटिबॉडीचा शोध घेतला. फुडन युनिव्हर्सिटीचे प्रमुख वैज्ञानिक हुआंग जिंगे यांनी म्हटले आहे की या शोधामुळे महामारीविरुद्धच्या लढ्यात माणसाचे एक पाऊल पुढे पडले आहे. मानवी रोगप्रतिकारक पेशींद्वारे उत्पादित दोन वेगवेगळ्या नैसर्गिक अँटिबॉडीपासून या नव्या अँटिबॉडीचा शोध लावण्यात आला.
दोन्ही नैसर्गिक अँटिबॉडींमध्ये ओमायक्रॉनला रोखण्यासाठीची क्षमता अतिशय कमी होती. मात्र, ही नवी अँटिबॉडी विषाणूचे सुरक्षा कवच तोडण्यास सक्षम आहे. ही अँटिबॉडी माणसाला अल्ट्रा-ट्रान्समिसिबल व्हायरसविरुद्धच्या लढाईत एक पाऊल पुढे ठेवेल.
हेही वाचा