Latest

New SUV Car : मारूती, ह्युंदाई, टाटा या बड्या कंपन्या लॉंच करणार नव्या कार

backup backup

पुढारी ऑनलाईल डेस्क : SUV कारच्या चाहत्यांसाठी ही मोठी खूशखबर आहे. 10 लाख रूपयांपेक्षा कमी किमतीच्या रेंजमधील टाटा नेक्सॅान, ह्युंदाई वेन्यू आणि मारूती सुझुकी ब्रिझा या भारतीय ग्राहकांच्या पसंतीच्या कार पहायला मिळतात. आता या सर्व कारच्या पुढील जनरेशनचे मॅाडेल लवकरच लॉंच होणार आहेत. या नव्या कार ग्राहकांना नव्या आकर्षक लूकमध्ये पहायला मिळतील.

सर्वात जास्त विकली जाणाऱ्या एसयूवी कार म्हणून टाटा, मारूती सुझुकी आणि ह्युदाई या कंपन्या भारतात अग्रेसर आहेत. टाटा कंपनी ही नेक्सॅान या कारचे पुढचे जनरशेन असणारे मॅाडेल लवकरच भारतात लॉंच करत असल्याचे कंपनीकडून सांगिण्यात आले आहे. त्याचबरोबर मारूती सुझुकी ही विटारा ब्रिझाचे आणि ह्युंदाई तिच्या वेन्यू फेसलिफ्टचे पुढचे मॅाडेल भारतात लॉंच करणार आहेत. अर्थातच भारतात SUV कार चाहत्यांसाठी हे सोनेरी क्षण पहायला मिळणार आहेत. बेस्ट सेलिंग असा टॅग मिळवत असणाऱ्या या तिन्ही कंपन्याच्या नव्या अपडेटेड कार ग्राहकांना आकर्षित करणार आहेत.

टाटा नेक्सॅान (New Tata Nexon )

भारतात सर्वात जास्त विकली जाणारी SUV TATA NEXON ही गेल्या 5 वर्षात आता दुसऱ्यांदा तिच्या सुधारित लुकमध्ये दिसून येईल. कंपनीच्या नवे नेक्सॅान हे मॅाडेल आकर्षक लुक आणि नव्या फिचर्समध्ये दिसून येईल. विशेष म्हणजे टाटा मोटर्स तिच्या या प्रसिद्ध SUV कारला माइल्ड हाइब्रिड टेक्नॅालॅाजीमध्ये लॉंच करेल. टाटा कंपनी नेक्सॅान मॅाडलचे पुढील जनरेशन हे ग्राहकांना येत्या दिवाळीमध्ये उपलब्ध करून देईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (MARUTI SUZUKI VITARA BREZZA)

मारुती सुझुकी लवकरच आपल्या बेस्ट सेलिंग SUV विटारा ब्रेझा (Vitara Brezza) चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉंच करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मारुती ब्रेझाचे नेक्स्ट जनरेशन या वर्षी एप्रिल किंवा मेमध्ये लॉंच केले जाऊ शकते. ही आगामी ब्रेझाकार सुधारित हायब्रिड प्रणाली, 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स तसेच अनेक कॉस्मेटिक बदलांसह आणली जात आहे. त्याचबरोबर यामध्ये 6 एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रामसह अनेक सुरक्षाविषयक फिचर्स आणि आकर्षक असे नवे फिचर्सदेखील मिळतील.

ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्ट (Hyundai Venue facelift)

ह्युंदाई मोटर्स यावर्षी तिच्या बेस्ट सेलिंग असलेल्या एसयुव्हीला अपडेट करत नवे फेसलिफ्ट मॅाडेल लॉंच करणार आहे. कंपनीच्या वेन्यू फेसलिफ्ट (Venue facelift) आणि क्रेटा फेसलिफ्ट या फेमस असणाऱ्या कार आहेत. आगामी काळात या दोन्ही कार सुधारित फिचर्स आणि नव्या लूकमध्ये दिसून येणार आहेत. यापैकी सध्या नवी वेन्यू फेसलिफ्ट ही जून किंवा जुलैमध्ये लॉंच करण्यात येईल असा अंदाज आहे. आगामी काळात येणारी नव्या रंगातील आणि नव्या ढंगातील वेन्यू फेसलिफ्ट मध्ये फिचर्सदेखील भरपूर असतील. पण या कारमध्ये मैकॅनिकल बदलांचा थोडासा अभाव दिसून येईल. विशेष म्हणजे ही नवी कार सिएनजी फिटेड असेल अंदाज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT