Latest

हरवलेल्या लोकांना शोधणार क्यूआर कोड असणारा नवा पेंडंट!

Arun Patil

मुंबई : मुंबईतील एका डाटा इंजिनिअरने क्यूआर कोड असणारा एक नवा पेंडंट तयार केला आहे. आश्चर्य म्हणजे हरवलेल्या लोकांना सुरक्षितपणे आपल्या घरी परतता यावे, यासाठी हा नवा पेंडंट विशेष उपयुक्त ठरणार आहे. 24 वर्षीय अक्षय रिडलान या तरुणाचे हे संशोधन दिव्यांग, ज्येष्ठ, अल्झायमर डिमेंशिया रुग्ण आणि ऑटिझ्मने पीडित मुलांसाठी वरदान ठरणार आहे.

या क्यूआर कोडमध्ये सदर व्यक्तीचा डाटा जोडून त्याला ते परिधान करण्यास दिले जाते. कोणत्याही हवामानात हे क्यूआर कोडचे पेंडंट अजिबात खराब होत नाही. यापूर्वी काही प्राण्यांवर क्यूआर कोड आधारित पट्टा लावण्याचा उपक्रम यशस्वी ठरला. त्यामुळे प्राण्यांचा ठावठिकाणा कुठे आहे, हे सहजपणे कळून येत होते. त्यानंतर ज्या व्यक्ती हरवण्याचा धोका असतो, त्यांच्या बाबतीत क्यूआर कोड असणारे हे पेंडंट विशेष लाभदायी ठरू शकते, असा होरा होता. तो तंतोतंत खरा ठरला आहे.

हा पेंडंट क्यूआर कोड कसा कार्यरत राहतो, हे देखील लक्षवेधी आहे. हा पेंडंट क्यूआर कोड ज्यावेळी कोणी स्कॅन करेल, त्यावेळी तो परिधान करणार्‍या व्यक्तीचे नाव, त्याचा पत्ता, रक्तगट आणि अन्य सर्व तपशील एका क्लिकवर उपलब्ध होतात आणि यामुळे आवश्यकतेनुसार त्या व्यक्तीच्या घरच्या लोकांशी सहज संपर्क केला जाऊ शकतो, अशी याची रचना करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT