Latest

मोठी बातमी: भाजपच्या संसदीय मंडळातुन नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान बाहेर, येडियुरप्पा यांची एन्ट्री

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: भारतीय जनता पक्षाने नवीन संसदीय मंडळाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान आणि नितीन गडकरी यांना मंडळात स्थान मिळालेले नाही. त्याचबरोबर बीएस येडियुरप्पा आणि बीएल संतोष यांना संसदीय मंडळात प्रवेश मिळाला आहे. गडकरींना दोन्ही समितीतून बाहेर करताना नव्या निवडणूक प्रचार समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री जेपी नड्डा हे संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष असणार आहे. या संसदीय समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेही असणार आहेत. ही संसदीय समिती एकूण 11 सदस्यांची आहे. आता या समितीतून दोन नेत्यांना वगळून तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

हे आहेत संसदीय मंडळातील नेते –

जेपी नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, बीएल संतोष (सचिव).

याशिवाय केंद्रीय निवडणूक समितीही स्थापन करण्यात आली आहे. त्यात 15 सदस्यांचा समावेश आहे. केंद्रीय संसदीय समितीप्रमाणेच जेपी नड्डा यांना निवडणूक समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

निवडणूक समितीत या नेत्यांचा समावेश

जेपी नड्डा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बीएल संतोष, वनथी श्रीनिवास.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT