Latest

वाराणसीत नवे क्रिकेट स्टेडियम; मोदींच्या हस्ते आज पायाभरणी

backup backup

वाराणसी : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असणार्‍या वाराणसीमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम तयार होणार असून यामध्ये महादेव आणि काशीची झलक पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी (23 सप्टेंबर) पूर्वांचलमधील क्रीडाप्रेमींना वाराणसी येथील क्रिकेट स्टेडियम भेट देण्यासाठी काशी येथे येत आहेत.

451 कोटी रुपये खर्चून हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येत असल्याने सामने पाहण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पायाभूत सुविधाही तयार होणार आहेत. योगी सरकारने या प्रकल्पात भूसंपादनासाठी 121 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर बीसीसीआय स्टेडियम बांधण्यासाठी 330 कोटी रुपये खर्च करणार आहे. या स्टेडियममध्ये 7 खेळपट्ट्या (सराव आणि मेन विकेट) व्यतिरिक्त 30 हजार प्रेक्षक क्षमतेचे अत्याधुनिक स्टेडियम बांधण्यात येणार आहे. डिसेंबर 2025 पर्यंत स्टेडियम तयार होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT