Latest

New Corona Guideline : ‘या’ देशांमधून येणा-या प्रवाशांसाठी आजपासून नवीन नियम लागू

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : New Corona Guideline : 2022 ला अलविदा करत लोकांनी धडाक्यात 2023 चे स्वागत केले. मात्र, या नवीन वर्षात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने बाहेरील चीनसह अन्य काही देशांतून येणा-या प्रवाशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन नियम आजपासून लागू केले आहे. चला जाणून घेऊया हे कोणते देश आहेत. तसेच तेथून येणा-या यात्रेकरुंसाठी काय आहेत नवीन नियम…

New Corona Guideline : आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांसाठी नवे नियम

चीन, जपान, दक्षिण कोरिया, आणि थायलंड येथून येणा-या प्रवाशांना काही गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहे. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एयर सुविधा लागू केली आहे आणि प्रत्येक प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे.

प्रवाशांना यात्रेच्या आधीच एयर सुविधा पोर्टल वर आपले निगेटिव कोरोना रिपोर्ट अपलोड करावे लागतील त्याशिवाय भारतात प्रवेश मिळणार नाही.

प्रत्येक यात्रेकरूंची थर्मल स्क्रीनिंग केली जाणार आहे.

एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे आढळल्यास, त्याला वेगळे केले जाईल आणि विशिष्ट थेरपी सुविधेकडे नेले जाईल.

प्रत्येक येणार्‍या आंतरराष्ट्रीय फ्लाइटमधील 2 टक्के प्रवाशांना आगमनानंतर कोविड-19 चाचणी करावी लागेल.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT