पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांना कोण ओळखत नाही. ते तीन वर्ष झाले आपल्यात नाहीत; परंतु त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. अभिनेता ऋषी कपूर यांची आज तिसरा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने ऋषी यांच्या पत्नी नीतू कपूर ( Neetu Kapoor ) आणि मुलगी रिद्धिमासोबत अनेक चाहत्यांनी त्याची आठवण काढली आहे. दरम्यान नीतू कपूर यांनी त्याचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री नीतू कपूरने ( Neetu Kapoor ) ऋषी कपूर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिना निमित्त इंस्टाग्रामवर त्यांचासोबत एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऋषी- नीतू दोघेही एकत्र हसताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "सर्व काही अद्भुत आठवणींसह दररोज तुझी आठवण येते." असे लिहिले आहे.
नीतूसोबत मुलगी रिद्धिमा कपूरनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तीन फोटो शेअर करून वडिलांची आठवण काढली आहे. रिद्धिमाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोत ऋषी कपूर, नीतू कपूर, रणबीर, रिद्धिमा हे सगळे कपूर कुटुंबीय एकत्रित दिसत आहेत. हा फोटो शेअर करत रिद्धिमाने लिहिले आहे की, 'तिला हा फोटो खूप आवडतो.'
दुसरा फोटो रिद्धिमाच्या बालपणीचा आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत ऋषी कपूरही दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, 'मला रोज तुझी आठवण येते'. आणि शेवटच्या तिसऱ्या फोटोत ऋषी कपूर हसताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रिद्धिमाने लिहिले की, 'कधीकधी मी तुम्हाला हसताना पाहण्यासाठी फोटो गॅलरीत जावून पाहत बसते. तुझ्यावर खूपच प्रेम आहे.' असे लिहिले आहे.
ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी 'अमर अकबर अँथनी' आणि 'कभी कभी' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. चित्रपटादरम्यान त्याच्यात मैत्री होवून प्रेम निर्माण झाले. आणि कुटूंबियाच्या सहमतीने दोघांनी जानेवारी १९८० मध्ये लग्न केले. दोघांना रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर ही मुले आहेत. यानंतर ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल २०२० मध्ये निधन झाले.
हेही वाचा :