Latest

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का, नीलम गोऱ्हे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नीलम यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानभवनात शिवसेना पक्ष कार्यालयात हा प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ठाकरे गटात नाराजी वगैरे नसते. मी अंधारेंमुळे नाराज नाही, असे मत त्यांनी स्पष्ट केले.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नीलम गोऱ्हे यांचा प्रवेश ऐतिहासिक आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. पवारांचा वय सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंकजाताईंशीही चर्चा करू. अजितादादांच्या शपथविधीमुळे त्या नाराज असण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, मंत्रीपद येतात आणि जातात. ते काही कायम नाहीत. नाराजी चर्चा म्हणजे विरोधकांचा कल्पनाविलास. आमचे आमदार समजूतदार आहेत. ते नाराज नाहीत.

नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. नीलम गोऱ्हे ह्या केवळ एक राजकीय नेत्या नसून तर त्यांनी पीडित महिलांसाठी मोठं काम उभं केलं आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हें यांच्याकडे पाहिलं जातं. आजचा त्यांचा हा निर्णय उद्धव ठाकरे गटातली उरली सुरली नारजी समोर येत आहे. त्यांच्या या शिवसेना प्रवेशाने ठाकरेंना चांगलाच धक्का बसला आहे. महत्त्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने आणि नेटाने, अभ्यासू वृत्तीने सतत शिवसेनेची बाजू मांडत असतात.

SCROLL FOR NEXT