Latest

पुणे: खासगी रुग्णालयांमध्ये प्रसुतींचे प्रमाण जास्त

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गेली तीन वर्षे शासकीय आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या संकटाशी लढण्यात व्यस्त होती. त्यामुळे शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये झालेल्या प्रसुतींचे प्रमाण जास्त असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. शहरातील एकूण प्रसुतींपैकी खासगी रुग्णालयांमध्ये 55 ते 60 टक्के प्रसुती झाल्या आहेत.

कोरोनाशी लढा देत असताना आरोग्य यंत्रणेचे मनुष्यबळ, साधनसामग्री, पायाभूत सुविधा कोव्हिड उपचारांसाठी वापरण्यात आल्या. मर्यादित मनुष्यबळात काम करत असताना शासकीय रुग्णालयांमधील नॉन-कोव्हिड उपचारांचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. सुरक्षितेच्या दृष्टीने बहुतांश नागरिकांनी प्रसुतीसाठी खासगी रुग्णालयांना पसंती दिल्याचे पहायला मिळाले.

कोरोना उपचार देत असताना गर्भवतींचे उपचार, प्रसुती यासाठीही सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या होत्या, असा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. कोरोना आटोक्यात येत असताना खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील तफावत कमी होत आहे. 2020-21 मध्ये खासगी रुग्णालयांत 68 टक्के, 2021-22 मध्ये 62 टक्के, तर 2022-23 मध्ये 56 टक्के प्रसुती झाल्या.
:
महापालिकेतर्फे गर्भवतींना राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आदींच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो. तसेच, महापालिकेच्या प्रसुतीगृहांमध्ये गर्भधारणा आणि प्रसुतींच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रसुतीगृहांच्या नियोजनासाठी 'अ‍ॅक्शन प्लॅन'ही तयार करण्यात आला आहे.
– डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

महापालिका हद्दीतील तीन वर्षांतील प्रसुती :

वर्ष            प्रसुती        खासगी                 शासकीय

2020-21    61344        41,828                  19,516
2021-22    59774        37,107                  22,667
2022-23    52,044       29,149                  22,895

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT