Latest

Nagaland Election Result 2023 live: नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीची पुन्हा सत्ता स्थापनेकडे वाटचाल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागालँड विधानसभेच्‍या ६० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत स्थानिक पक्ष 'एनडीपीपी'ला २९ जागांवर तर या पक्षाशी युती असलेला भाजपला १४ जागांवर आघाडी आहे. या निर्णायक आघाडीमुळे नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप युतीची पुन्‍हा सत्ता स्‍थापनेकडे वाटचाल सुरु झाली आहे.

भाजप तीन मतदारसंघात आघाडीवर आहे, तर मुख्यमंत्री नेफियू रिओ यांच्या नेतृत्वाखालील NDPP ने 11 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. तर  विरोधी पक्षातअपक्ष, काँग्रेस आणि एनपीपी प्रत्येकी दोन जागांवर आघाडीवर आहेत. जद (यू), आरपीआय (ए) आणि एलजेपी (रामविलास) प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत,

निवडणुकीपूर्वीच NDPP-BJP चा 40 : 20 फॉर्म्युला

राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) आणि भाजप यांची निवडणूकपूर्व युती होती.  त्यांनी 40:20 जागा वाटपाच्या आधारावर निवडणूक लढवली होती. नागा पीपल्स फ्रंट (NPF) ने 22 जागा लढवल्या आणि 2003 पर्यंत राज्यात सत्ता गाजवणाऱ्या आणि सध्याच्या सभागृहात एकही सदस्य नसलेल्या काँग्रेसने 23 जागांवर निवडणूक लढवली होती.

२०१८ च्या विधानसभेत NDPP-BJP युती

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी(NDPP) पक्षाने १८ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर या पक्षाने भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. नागा पीपल्स फ्रंटला २५ जागा जिंकून देखील सरकार स्थापन करता आले नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणूकीत नागा पीपल्स फ्रंट-25, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी-21, भारतीय जनता पार्टी-12, अपक्ष-2 अशा जागांवर यश मिळवले होते.

भाजपा-एनडीपीला पुन्हा बहुमत?

२०२३ च्या नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी युतीची वाटचाल बहुमताकडे सुरु झाली आहे. नागालँडचे सध्याचे मुख्यमंत्री नेफिओ रिओ यांनी नॉर्थन अंगामी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी रिओ हे चारवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ते आणखी एक टर्म मुख्यमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT