Latest

Rohit patil : आर आर पाटलांच्या रोहितनं नगरपंचायतीचं एकहाती मारलं मैदान

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकींचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सांगलीतील कवठेमहांकाळ नगरपंचायतीची चर्चा राज्यभर झाली होती. कारण माजी गृहमंत्री आर आर पाटील ( Rohit patil ) यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी एकट्याने नगपंचायत लढली होती. यामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीला १० तर शेतकरी विकास आघाडीला ६, अपक्ष १, भाजपला ० जागा मिळाल्या आहेत. राहित पाटील ( Rohit patil ) यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.

माझं वयं २३ आहे, २५ होईपर्यंत विरोधकांच काहीच ठेवत नाही

२५ वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय २३ चं आहे, २५ होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही, असा इशारा माजी गृहमंत्री स्वं. आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील विरोधकांना दिला होता. नगरपंचायत निवडणूक प्रचारातील रोहित पाटील ( Rohit patil )यांचे हे भाषण राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

माझा बाप नक्की आठवेल

रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती.

निकाल असा

  • राष्ट्रवादी पॅनेल  १०
  • शेतकरी विकास पॅनल ६ जागी विजयी
  • १अपक्ष विजयी

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT