Latest

ncp chief sharad pawar | साहेब, निवृत्ती मागे घ्या, शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याबाबतची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी आज (दि. २) केली. शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केल्याने पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात (sharad pawar books) उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला, अनेक कार्यकर्त्यांना तर अश्रू अनावर झाले होते. साहेब, निवृत्तीचा निर्णय मागे घ्या, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली.

"कमिटीमध्ये आपलेच लोक असणार आहेत. कमिटीमध्ये चर्चा करत असताना कार्यकर्त्यांची भावनिक साद लक्षात घेतली जाईल. समिती ठरवेल तो निर्णय शरद पवार यांना मान्य असेल," असे म्हणत अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होण्याबाबतचा निर्णय आज घेतला आहे, अशी घोषणा करत राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल, हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २) केले. यावेळी पवार म्हणाले की, आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेली ६० वर्षांहून अधिक काळ मी राजकारण आणि समाजकारणात मी सक्रिय आहे. यापुढेही मी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार आहे, असेही ते म्हणाले.

सभागृहातच निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध

शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहातच कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करत त्यांनी पवारांच्या निवृत्तीला तीव्र विरोध केला. व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. (ncp chief sharad pawar resigns)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT