Latest

छत्तीसगड : सुकमा येथे चकमकीत नक्षलवादी ठार

स्वालिया न. शिकलगार

छत्तीसगड : पुढारी ऑनलाईन – सुकमा येथील बुरकालंका भागात डीआरजी जवानांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. ठार झालेल्या नक्षल्याचा मृतदेह सापडला आहे. शोधमोहीम सुरू असल्याची माहिती एसपी किरण चौहान यांनी दिल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

बस्‍तर संभागमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरु आहे. या क्रमात डीआरजीचे जवान शुक्रवारी रात्री मोहिमेवर निघाले होते. यावेळी शोधमोहिमेदरम्यान, डीआरजी जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. बुरकालंका भागात एक नक्षली ठार झाला.

SCROLL FOR NEXT