Latest

सैराट झालं जी…ट्रॅक्टर चालवताना दिसली नव्या नंदा! (Video)

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तिच्या साधेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. दोनच दिवसांपूर्वी नव्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती चक्क ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.

सध्या नव्या गुजरातमधील गणेशपुरा गावात आहे. नव्या ही उद्योग व्यवसायात आहे. तिने सर्वप्रथम या गावात ट्रॅक्टर चालवला आणि त्यानंतर गावातील महिलांशी संवाद साधला. नव्या ही महिला-केंद्रित आरोग्य तंत्रज्ञान कंपनी आरा हेल्थची सह-संस्थापक आहे. याच निमित्ताने ती गुजरातमध्ये पोहोचली आहे.

नव्याच्या या व्हिडिओवर तिची आई श्वेता बच्चन, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, सोनाली कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नव्याच्या आईने 'किती गोड' असे लिहिले. तर सिद्धांतने 'नदिया के पार' असे लिहिले आहे. याशिवाय नव्याच्या चाहत्यांनीही तिच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.

नव्या आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्या लिंकअपच्या बातम्या बर्‍याच काळापासून चर्चेत आहेत. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. एका कार्यक्रमात सिद्धांतला तो नव्याला डेट करत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला होता, 'माझी इच्छा आहे की ही अफवा खरी ठरो' सिद्धांतच्या उत्तरावरून त्याला नव्याला डेट करायचे असल्याचे स्पष्ट झाले होते आणि यावरुन बरीच चर्चा रंगली होती.

नव्या ही जया आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनची मुलगी आहे. श्वेताने 1997 मध्ये बिझनेसमन निखिल नंदासोबत लग्न केले. 1997 नव्याचा जन्म झाला. नव्याला एक भाऊ असून त्याचे नाव अगस्त्य नंदा आहे. 2000 मध्ये अगस्त्यचा जन्म झाला.सोशल मीडियावर नव्याचा मोठा फॅन फॉलोइंग आहे आणि ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. तिने न्यूयॉर्कमधील फोर्डहॅम विद्यापीठातून डिजिटल तंत्रज्ञानात पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे आजोबा आणि मामाच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राची निवड करण्याऐवजी नव्याने फॅमिली बिझनेस सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच क्षेत्रात यापुढेही कार्यरत राहण्याचा तिचा मानस आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT