Latest

Navratri festival 2022 : रसिकांमध्ये गरबा दांडियाचा उत्साह शिगेला, बंगळुरू विमानतळावर प्रवाशांच्या गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Navratri festival 2022 : सध्या संपूर्ण देशात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अंबेचा जयघोष सर्वत्र निनादत आहे. तर कोरोनानंतर पहिल्यांदाच गरबा-दांडियांचे कार्यक्रम ठिकाठिकाणी होत आहे. रसिकांमध्ये गरब्यावर थिरकण्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्यामुळे यावर्षीचा नवरात्र उत्सवाचा उत्साह अगदीच शिगेला पोहोचला आहे, हे बंगळुरू विमानतळावरील व्हायरल व्हिडिओवरून दिसून येते. या व्हिडिओमध्ये विमानतळावरील प्रवाशांनी अचानक एकत्र येऊन गरब्याचा फेर धरलेला दिसून येत आहे.

Navratri festival 2022 : एक ट्विटर वापरकर्ती दिव्या पुत्रेवु हिने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये बंगळुर विमानतळावरील प्रवाशांचा एक समूह अचानकच एकत्र येऊन गरबा डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सर्व प्रवाशी किती लयबद्ध रित्या तल्लीन होऊन गरबा खेळत आहे, हे या व्हिडिओमधून जाणवत आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव किती शिगेला पोहोचला आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती येते.

Navratri festival 2022 : महत्वाचे म्हणजे बंगळुरू विमानतळावरील अन्य कोणत्याही प्रवाशांनी यावर आक्षेप घेतलेला नाही. उलट अन्य लोक सुद्धा याचा आनंद घेताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना पुत्रेवूने लिहिले आहे, " विश्वास ठेवा जेव्हा आम्ही म्हणतो की बंगळुरूमध्ये काहीही होऊ शकते. कर्मचा-यांद्वारे क्रेझी इव्हेंट! प्रवाशांना फक्त गरबा खेळण्यासाठी एकत्रित होताना पाहणे हा एक अनोखा अनुभव आहे."

Navratri festival 2022 : हा व्हिडिओ ट्विटरवर खूप ट्रेंड करत आहे. याला 3769 पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. या व्हिडिओवर बंगळुर विमानतळाच्या ट्विटर अकांउंट वर प्रतिक्रिया देण्यात आली आहे, " नमस्कार , उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद! बंगळुरू विमानतळ प्रवाशांना उत्तम अनुभव प्रदान करण्यासाठी अग्रणी बनण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे यात्री जेव्हा आमच्या प्रयत्नांची स्तूती करतात तेव्हा आम्हाला चांगले वाटते.

तर एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली आहे, "नम्मा बंगळुरू अनेक संस्कृतिंना विरघळणारे भांडे आहे." तर दुस-या एकाने लिहिले आहे "लव द वाईब्स," आणखी एकाने म्हटले आहे की "इथे काहीही होऊ शकते आणि म्हणूनच आमचे" बंगळुरूवर प्रेम आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT