Latest

Navratri 2023 Brahmacharini : दुर्गेचे दुसरे रूप : ब्रह्मचारिणी

स्वालिया न. शिकलगार

दधाना करपद्माभ्यामक्षमाला कमण्डलू। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥ 'नवशक्तींपैकी 'ब्रह्मचारिणी' हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. (Navratri 2023 Brahmacharini) येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. (Navratri 2023 Brahmacharini)

या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यावेळी नारदमुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा, यासाठी कठोर तपस्या करायला सांगितले होते. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात.

अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की, 'हे देवी! तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील, ' असा वर त्यांनी दिला. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.

SCROLL FOR NEXT