Latest

Navratri 2023 : दुर्गेचे पाचवे रूप : स्कंदमाता

दिनेश चोरगे

सिंहसनगता नित्यं पद्माश्रित करद्वया ।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी॥

दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावानेही ओळखले जाते. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.

स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे. त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.

स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT