Latest

Navratri 2023 : क्षेमंकरी दुर्गा

स्वालिया न. शिकलगार

दुर्गेची सौम्य, कल्याणकारक जी रूपे आहेत, त्यामधील एक म्हणजे क्षेमंकरी दुर्गा हे होय. (Navratri 2023 : क्षेमंकरी दुर्गा) क्षेम म्हणजे कल्याण करणारी दुर्गा. शाक्त आगम ग्रंथांमध्ये जी नवदुर्गा संकल्पना मांडली गेली होती, त्यातील एक रूप क्षेमंकरी दुर्गा होय. (Navratri 2023 : क्षेमंकरी दुर्गा) 'रूपमण्डन' नावाच्या संस्कृत ग्रंथात तिच्या वर्णनाचा श्लोक आढळतो, तो असा :

"वरं त्रिशूलं पद्मं च पानपात्रं करे तथा । क्षेमङ्करी तदा नाम क्षेमारोग्यप्रदायिनी ॥"

याचा अर्थ असा की, 'क्षेमंकरी ही दुर्गा कल्याण करणारी आणि आरोग्य देणारी आहे. तिचा एक हात आशीर्वाद देणारा म्हणजे वरद मुद्रेत असतो. अन्य तीन हातांमध्ये ती त्रिशूळ, कमळ आणि पेयपात्र धारण करते.' अन्य काही मूर्तीमध्ये तिला दशभुजा रूपातही दाखविले जाते.

SCROLL FOR NEXT